-
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे अमोल नाईक.
-
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून तो घराघरात पोहोचला आणि सर्वांच्या परिचयाचा चेहरा बनला.
-
या मालिकेत त्याने राणाचा मित्र ‘बरकत’ची भूमिका साकारली होती.
-
सतत नवीन काहीतरी करण्याच्या तो मागे असतो.
-
तो लहान असताना त्यांच्या मंडळाच्या जिवंत देखाव्यात भाग घेत असे, तिथेच माझ्या अभिनयाच्या कलेची सुरुवात झाली.
-
नुकतेच गणेशोत्सवाचं निमित्त साधून त्याने एक खास फोटोशूट केले आहे.
-
यात तो लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत दिसत आहे.
-
या फोटोशूटच्या माध्यमातून समाजप्रभोधन घडून लोकांना काहीतरी संदेश देण्याच्या दृष्टीने त्याने हे फोटोशूट केले.
-
या फोटोशूटमध्ये त्याच्यासोबत मेकअप आर्टिस्ट आणि डिझायनर स्वरा शेट्येही सहभागी झाली आहे.
-
लोकमान्य टिळकांमुळे आपण गणपती एका उत्सवासारखा साजरा करू लागलो. या फोटोंमधून त्यांना वंदन करण्यात आले आहे.
-
त्यांच्या या वेगळ्या संकल्पनेला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”