-
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते.
-
प्राजक्ता वेळोवेळी तिच्या कामाचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतेच पण यासोबत तिच्या रोजच्या आयुष्यातील घडमोडी आणि अनुभव याबाबतही ती अनेकदा लिहिताना दिसते.
-
सध्या संपूर्ण महाराष्टात गणेशोत्सव साजरा केला जातोय आणि प्राजक्ताने पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं दर्शन घेतलं.
-
या दर्शनाचे काही फोटो प्राजक्ता माळीने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
-
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर पुण्यातील मानाच्या गणपतींच्या दर्शनाचे फोटो शेअर केले आहे.
-
हे फोटो शेअर करताना तिने लिहिलं, “सालाबादप्रमाणे… पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं दर्शन. त्याचबरोबर यंदा वर्षी “हिंदूस्तानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची – भाऊसाहेब रंगारी गणेशाची” आरती करण्याचं पुण्य पदरात पडलं.”
-
प्राजक्ताची ही पोस्ट आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये तिच्यासह तिची भाचीही दिसत आहे.
-
प्राजक्ता माळीच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
दरम्यान प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचं तर काही दिवसांपासून ती रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती.
-
यानंतर ती कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित वाय चित्रपटात झळकली होती. ज्याची बरीच चर्चा झाली.
-
त्यासोबत प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनही करताना दिसते.
-
(सर्व फोटो- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”