-
रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटात रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
-
मागच्या काही दिवसांत बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होत असल्याने ब्रम्हास्त्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरेल की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
-
रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचं बजेट ४०० कोटींवर गेलं असून हा बॉलिवूडच्या महागड्या चित्रपटांपैकी एक आहे.
-
या चित्रपटात काम करण्यासाठी रणबीर कपूरने त्याचा मित्र आणि चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीकडून सर्वाधिक मानधन घेतल्याचं कळतंय.
-
अयानचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून तो पूर्ण व्हायला तब्बल ५ वर्षे लागली आहेत.
-
चित्रपटावर आतापर्यंत ४१० कोटी रुपयांचा खर्च झालाय.
-
या चित्रपटात आतापर्यंत अॅडव्हान्स VFX वापरण्यात आल्याचं म्हटलं जातंय. चित्रपटाच्या व्हीएफएक्स आणि स्पेशल इफेक्ट्सवर सुमारे ५० ते ७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
-
रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूरने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी २५ ते ३० कोटीदरम्यान मानधन घेतलंय.
-
रणबीर कपूरची पत्नी आलिया भट्टने ब्रह्मास्त्रसाठी १० ते १२ कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
-
रणबीर आणि अयान मुखर्जीबरोबर आलियाचा हा तिचा पहिला चित्रपट आहे. दरम्यान, सध्या रणबीर आणि आलियाची केमिस्ट्री चांगलीच चर्चेत आहे.
-
अमिताभ बच्चन यांनी ब्रह्मास्त्रमध्ये गुरूची भूमिका साकारण्यासाठी ८-१० कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे.
-
अमिताभ बच्चन या चित्रपटात महत्त्वाच्या म्हणजेच रणबीरच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
साऊथ सुपरस्टार नागार्जुनही ब्रह्मास्त्रमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यासाठी त्यांनी ९ ते ११ कोटी रुपये मानधन घेतल्याचं कळतंय.
-
ब्रह्मास्त्रमध्ये मौनी रॉय नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. ती जुनून नावाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी तिने ३ कोटी रुपये घेतले आहेत.
-
दरम्यान, या चित्रपटात शाहरुख खान वानरस्त्राच्या भूमिकेत दिसणार आहे. पण त्याने किती मानधन घेतलं याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
-
रिपोर्ट्सनुसार ब्रह्मास्त्र हा आतापर्यंतचा सर्वात महागडा बॉलिवूड चित्रपट आहे.
-
चित्रपटाचे बजेट सुमारे ४०० कोटींवर गेलं असून यात प्रमोशनचा खर्च समाविष्ट नसल्याचं म्हटलं जातंय. (फोटो संग्रहित आणि व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO