-
अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनिलिया डिसुझा ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
-
सोशल मीडियावर ते दोघेही सक्रिय राहून त्यांच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना देत असतात.
-
या वर्षीचा गणेशोत्सव रितेश व जेनिलियासाठी खूपच खास ठरला.
-
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रितेश व जेनिलियाने नवी कोरी गाडी खरेदी केली आहे.
-
या इलेक्ट्रिक गाडीचे नाव BMW iX असून या आलिशान कारची किंमत सुमारे १.४३ कोटी आहे.
-
हे दोघे अर्पिता खान व आयुष शर्माच्या घरी गणपती पूजेसाठी गेले असताना त्यांनू याच रॉयल कारमधून एन्ट्री केली.
-
यावेळी त्यांची दोन्ही मुलेही त्यांच्याबरोबर होती.
-
रियान देशमुख आणि राहिल देशमुख अशी त्यांची नावे आहेत.
-
रितेश व जेनिलिया भडक लाल रंगाच्या गाडीमधून आले आणि सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या.
-
रितेशला गाड्यांचे भरपूर वेड आहे. त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्यांचं कलेक्शन आहे.
-
रितेशच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेंजपासून रेंज रोव्हर अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
-
रितेश आणि जेनिलियाने ही नवी गाडी खरेदी केल्याचे कळल्यावर त्यांचे चाहते खूप खुश झालेले पहायला मिळत आहेत.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख