-
फराह खान :
फराह खान ही बॉलिवूडमधील आघाडीची दिग्दर्शिका म्हणून ओळखली जाते. तिने ९ डिसेंबर २००४ साली वयाच्या ३९ व्या वर्षी शिरीष कुंदरशी लग्न केलं. -
‘मै हू ना’च्या शूटिंगदरम्यान हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
-
त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुलं आहेत.
-
नीन गुप्ता :
अभिनेत्री नीन गुप्ता या त्यांच्या बिनधास्तपणामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांची वक्तव्ये असो अथवा त्यांचा फॅशन सेन्स, त्या सर्वांचे लक्ष्य वेधून घेत असतात. प्रसिद्ध क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्ससोबत त्या रिलेशनशिपमध्ये होत्या. अविवाहित असूनही त्या वयाच्या ३६ व्या वर्षी आई बनल्या आणि त्यानंतर त्यांनी त्यांची मुलगी मसाबा हिला एकटीने वाढवले. -
काही वर्षांपूर्वी वयाच्या ४९ व्या वर्षी नीना गुप्ता यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २००८ मध्ये त्यांनी विवेक मेहरा यांच्याबरोबर संसार थाटला.
-
प्रीती झिंटा :
बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री प्रीती झिंटाने अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले. -
तिने तिच्या सहज सुंदर अभिनयाने आणि तिच्या गोड हास्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले.
-
२०१६ साली वयाच्या ४६ व्या वर्षी प्रीती झिंटाने तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्य अमेरिकन जीन गुडइनफशी लग्न केले.
-
सुहासिनी मुळे :
अभिनेत्री सुहासिनी मुळे यांचे नाव मनोरंजनसृष्टीत आदराने घेतले जाते. त्यांनी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचे अनेक चित्रपट गाजले. -
त्यांनी १६ जानेवारी २०११ रोजी वयाच्या 60 व्या वर्षी प्रियकर अतुल गुर्टू यांच्यासोबत लग्न केले.
-
उर्मिला मातोंडकर :
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर एकेकाळी असंख्य चाहत्यांच्या मनावर राज्य करत होती. -
उर्मिलाने वयाच्या ४२ व्या वर्षी काश्मिरी व्यापारी आणि मॉडेल मोहसिन अख्तरसोबत लग्न केले.
-
एके दिवशी तिने अचानक लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड