-
अभिनेता सुनिल शेट्टीची लेक अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू के एल राहुल एकमेकांना डेट करत असल्याचं जाहीर आहे.
-
अथिया-राहुल लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्याही सध्या चर्चा रंगत आहेत.
-
दोघांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात केली असून दाक्षिणात्य पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं बोललं जातंय.
-
डिसेंबरमध्ये अथिया-राहुल लग्न करणार आहेत.
-
ते कुठे लग्न करणार याच्या सध्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
-
अनेक मोठ्या मोठ्या फाइव्ह स्टार हॉटेल्सची नावं या यात घेतली जात आहेत.
-
परंतु आता अशी बातमी समोर आली आहे की, राहुल-अथिया कोणत्याही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्याच्या बंगल्यात ही दोघे विवाहबद्ध होणार आहेत.
-
सुनील शेट्टी यांनी १७ वर्षांपूर्वी त्यांचा खंडाळ्याचा आलीशान बंगला बांधला होता.
-
३ वर्षांपासून अधिक काळ अथिया-के एल राहुल एकमेकांना डेट करत आहेत.
-
शिवाय राहुलच्या कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वीच अथियाच्या आई-वडिलांची भेट घेतली असल्याचीही चर्चा आहे.
-
अथिया आणि केएल राहुल नेहमीच एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात.
-
आता या सेलिब्रिटी कपलच्या लग्नाची सारेच जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”