-
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
-
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त भक्तीमय वातावरण आहे आणि यात प्राजक्ताही सहभागी झाली आहे.
-
काही दिवसांपूर्वीच तिने पुण्यातील मानाच्या गणपतींचं दर्शन घेतलं होतं.
-
यावेळचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
त्यानंतर आता तिने नुकतंच मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शन घेतलं.
-
या दर्शनाचे फोटो प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
यावेळी प्राजक्तासह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची टीमही होती.
-
प्राजक्ताने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
हे फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “…आणि यावेळी राजाचं दर्शन हास्यजत्रेच्या कुटुंबासह झालं.”
-
“२ वर्षांनी सण- उत्सवांचा आनंद मिळतोय.. सगळा उट्टा काढणार” असंही तिने या कॅप्शनमध्ये पुढे लिहिलं आहे.
-
(सर्व फोटो- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल