-
१९९५ साली प्रदर्शित झालेला ‘त्रिमूर्ति’ या मुकुल आनंद दिग्दर्शित चित्रपटात जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, शाहरुख खान हे कलाकार होते.
-
चित्रपट फ्लॉप असला तरी त्याकाळात पहिल्याच दिवशी १ कोटीची कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला होता.
-
नंतर मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.
-
अजय देवगणचे वडील विरू देवगण यांचा पहिला दिग्दर्शित चित्रपट म्हणजे ‘हिंदुस्तान की कसम’.
-
या चित्रपटात अमिताभ बच्चन, अजय देवगण, सुश्मिता सेन, मनीषा कोइरालासारखे स्टार्स होते.
-
या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १.४५ कोटींची कमाई केली पण नंतर मात्र हा चित्रपट सपशेल आपटलाच.
-
२००० च्या सुरुवातीच्या काळात अभिषेक बच्चन आणि करीना कपूर या दोघांचा पहिला चित्रपट ‘रेफ्यूजी’ प्रदर्शित झाला.
-
यामध्ये दोघांच्या अभिनयाचं कौतुक झालं, तसेच गाणीसुद्धा सुपरहिट ठरली.
-
चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी पहिल्या दिवशी याने १.५६ कोटी एवढी कमाई केली.
-
आमिरच खानचा एक वेगळाच लूक ज्या चित्रपटात पाहायला मिळाला तो म्हणजे ‘मंगल पांडे’.
-
काही सीन्स आणि डायलॉगमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.
-
चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला असला तरी केवळ आमिर खान या नावामुळे चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३.२४ कोटी कमावले.
-
‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचीसुद्धा तेव्हा चांगलीच चर्चा झाली.
-
अमिताभ बच्चन आणि आमिर खान यात प्रथम एकत्र दिसणार होते त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता होती.
-
हा चित्रपट आमिरच्या करकीर्दीतला सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला असला तरी पहिल्या दिवशी या चित्रपटाने तब्बल ५० कोटी एवढी कमाई केली होती. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)
७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?