-
अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरचा गणपती हा दरवर्षीच आकर्षणाचा विषय ठरतो. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी कला, समाजिक, राजकीय क्षेत्रातली अनेक मान्यवर मंडळी नाना पाटेकर यांच्या घरी भेट देतात.
-
नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी भेट दिली.
-
एकनाथ शिंदे अभिनेते नाना पाटेकर यांच्या सिंहगड पायथ्याशी असलेल्या डोणजे येथीस फार्म हाऊसवर गेले.
-
यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांच्याघरी स्थापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं.
-
नानांनी स्वतःच्या हाताने मुख्यमंत्र्यांसाठी चुलीवरचे पिठलं केले होते.
-
एकनाथ शिंदे यांनी नाना पाटेकर यांच्या घरी जेवणाचाही आस्वाद घेतला
-
नाना आणि त्यांच्या कुटुंबीयांशी एकनाथ शिंदे यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.
-
यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांच्याघरी स्थापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं.
-
सुमारे सव्वा तास ते नाना यांच्या फाहाऊसवर रमले होते.
-
संध्याकाळी सहा वाजता ते मुंबईला निघाले.
-
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच पुणे दौऱ्यावर होते.
-
त्यांनी पुण्यातील अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेतले. त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचीही आरती केली. यानंतर मुख्यमंत्री अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”