-
सुप्रसिद्ध पॉप सिंगर आणि रॅपर हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवार यांचा कायदेशिररित्या घटस्फोट झाला आहे.
-
दिल्लीतील जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबीक न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजूर केला आहे.
-
शालिनीने हनी सिंगविरोधात कौटुंबीक हिंसाचाराची तक्रार दाखल करत घटस्फोट मागितला होता, त्यावर कोर्टात सुनावणी सुरू होती.
-
कोर्टाने घटस्फोट मंजूर केल्यानंतर हनी सिंग आणि शालिनी यांचा ११ वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे.
-
हनी सिंगची पत्नी शालिनीने गेल्या वर्षी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता आणि पतीवर घरगुती हिंसाचार आणि इतर महिलांसोबत शारीरिक संबंधांसह अनेक गंभीर आरोप केले होते.
-
हनी सिंग आणि शालिनी यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
-
पण दोघंही लग्न टिकवू शकले नाही आणि ११ वर्षांनी दोघंही वेगळे झाले आहेत.
-
रिपोर्ट्सनुसार, शालिनीने हनी सिंगकडून घटस्फोटाच्या बदल्यात सुमारे १० कोटी रुपयांची पोटगी मागितली होती, परंतु तिला पोटगी म्हणून १ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
-
गायकाने न्यायालयात पोटगीचा एक कोटी रुपयांचा धनादेश सीलबंद कव्हरमध्ये शालिनीला दिल्याचं कळतंय.
-
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शालिनी तलवारने पती हनी सिंगविरोधात मारहाण आणि हल्ला घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. तिने पतीसह सासरच्या लोकांवरही अनेक गंभीर आरोप केले होते.
-
माझा नवरा माझ्यावर अत्याचार करतो, माझं मानसिक आणि आर्थिक शोषण करतो असं शालिनीने तक्रारीत म्हटलं होतं.
-
हनी सिंगच्या आई वडीलांनी आणि छोट्या बहिणीनेही आपल्यावर अत्याचार केल्याचं शालिनीने तक्रारीमध्ये म्हटलं होतं.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने दावा केला होता की, एके दिवशी ती रूममध्ये कपडे बदलत होती तेव्हा तिचे सासरे दारूच्या नशेत खोलीत शिरले होते. सासऱ्यांनी चुकीच्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तिने केला होता.
-
याशिवाय शालिनीने पती हनी सिंगवर आरोप करत म्हटलं होतं की, लग्नानंतर हनी सिंग तिला मारहाण आणि शिवीगाळ करायचा.
-
तसेच त्याचे लग्नानंतरही अनेक महिलांशी अवैध संबंध असल्याचे आणि तो त्यांच्यासोबत सेक्स करायचा, असे धक्कादायक आरोपही केले होते.
-
हनीमूनसाठी मॉरिशसला गेल्यावर ट्रीपदरम्यानच हनी सिंगने पत्नीवर हात उचलण्यास सुरुवात केल्याचा आरोप शालिनीने केला होता.
-
दरम्यान, “शालिनीने केलेल्या सगळ्या आरोपांचे मी खंडन करतो पण मी यावर काही बोलणार नाही कारण हे प्रकरण न्यायालयात आहे. या देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की सत्य लवकरच समोर येईल,” असं हनी सिंग म्हणाला होता. त्यानंतर आता कोर्टाने हनी सिंग आणि शालिनीचा घटस्फोट मंजूर केला आहे.
-
हनी सिंग आणि शालिनी यांची भेट शाळेत शिकत असताना झाली होती. इथून दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले.
-
१० वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर १४ मार्च २०१० रोजी हनी आणि शालिनीने घरच्यांच्या संमतीने साखरपुडा केला. त्यानंतर २३ जानेवारी २०११ रोजी सरोजनी नगरमधील गुरुद्वारामध्ये लग्न केलं होतं.
-
परंतु, हनी सिंगने जवळपास ४ वर्षे आपल्या लग्नाबद्दलची माहिती लपवून ठेवली होती. दोघांच्या लग्नाबद्दल चाहत्यांना कळाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्यातील वादाच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या.
-
पुढे शालिनीने हनी सिंगपासून घटस्फोट मागितला होता. आता दिल्ली कोर्टाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. (सर्व फोटो – सोशल मीडियावरून साभार)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ