-
बॉलिवूड रॅपर हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवार यांचा घटस्फोट झाला आहे.
-
हनी सिंगच्या पत्नीने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत घटस्फोटाची मागणी केली होती.
-
शालिनीने पोटगी म्हणून हनी सिंगकडे १० कोटी रुपयांची मागणी केली होती मात्र न्यायालयाच्या मध्यस्थीने ही रक्कम १ कोटी रुपये एवढी ठरवण्यात आली.
-
हनी सिंगच्या अगोदरही बॉलिवूडमधील अशा काही चर्चित जोड्या आहेत ज्यांचे घटस्फोट बरेच महागडे ठरले आहेत.
-
हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट देशभरात चर्चेत राहिला होता. दोघांनी २००० साली लग्न केलं होतं आणि २०१३मध्ये विभक्त झाले.
-
या दोघांचा घटस्फोट सर्वात महागडा मानला जातो. कारण सुझानने हृतिककडे ४०० कोटींची मागणी केली होती मात्र हृतिकने तिला ३८० कोटी रुपये पोटगी म्हणून दिले.
-
प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरने लग्नाच्या ११ वर्षांनंतर २०१४ साली न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. २०१६ मध्ये तिचा घटस्फोट झाला.
-
यावेळी करिश्मा आणि संजय कपूर यांनी १४ कोटी रुपयांचं एक एग्रीमेंट साइन केलं होतं. ज्याद्वारे संजय दर महिना करिश्माला १० लाख रुपये देतो.
-
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. लग्नाच्या १९ वर्षांनंतर हे दोघं वेगळे झाले.
-
यावेळी मलायका अरोराने पोटगी म्हणून १५ कोटी रुपयांची मागणी केली होती आणि अरबाजने ती मान्यही केली होती.
-
अभिनेता आमिर खानने पहिली पत्नी रीना दत्ताला २००२ साली घटस्फोट दिला. त्यावेळी त्याने तिला ५० कोटी रुपये पोटगी म्हणून दिले होते.
-
यानंतर त्याची दुसरी पत्नी किरण रावने लग्नाच्या १५ वर्षांनंतर २०१९ मध्ये त्याच्यापासून घटस्फोट दिला आहे. ज्याची खूप चर्चा झाली होती.
-
अभिनेता सैफ अली खानने १९९१ मध्ये स्वतःपेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृताशी लग्न केलं होतं. पण नंतर या दोघांचा घटस्फोट झाला.
-
घटस्फोटाच्या वेळी सैफने अमृताला ५ कोटी रुपये पोटगी म्हणून देण्याचं मान्य केलं आणि २.५ कोटी त्याने तिला त्याच वेळी दिले.
-
याशिवाय तो मुलांच्या देखभालीसाठी तिला प्रत्येक महिन्याला १ लाख रुपये देतो.

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच