-
अभिनेत्री बिपाशा बासू लवकरच आई होणार आहे.
-
अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंग ग्रोवर यांनी काही दिवसांपूर्वी आई-बाबा होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.
-
त्यानंतर गुरुवारी (८ सप्टेंबर) बिपाशाच्या कुटुंबाने तिच्यासाठी डोहाळे जेवणाचा म्हणजेच बेबी शॉवर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
-
बिपाशाची आई मुमू बासूने तिच्यासाठी पारंपारिक बंगाली शैलीत बेबी शॉवरचं आयोजन केलं होतं.
-
बेबी शॉवरला बंगालीमध्ये ‘साध’ म्हटलं जातं.
-
या कार्यक्रमात येणारे पाहुणे बाळाला आणि आईला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतात.
-
बिपाशाच्या बेबी शॉवर कार्यक्रमात फक्त तिचे कुटुंबीयच सहभागी झाले होते.
-
यावेळी बिपाशाने राणी कलरची साडी, पारंपारिक सोन्याचा नेकलेस आणि साडीला मॅचिंग टिकली आणि बांगड्या घातल्या होत्या.
-
बिपाशा पारंपारिक पोशाखात खूप सुंदर दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसत होता.
-
बिपाशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कार्यक्रमातील बरेच फोटो देखील शेअर केले आहेत.
-
यावेळी पांढऱ्या कुर्ता-पायजामामध्ये करणही खूप छान दिसत होता आणि तो मोठ्या उत्साहाने सर्व विधींमध्ये भाग घेत होता.
-
बिपाशाने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे आणि करणचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
बिपाशाचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
बिपाशाच्या फोटोंवर बॉलिवूडमधील कलाकारांसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय.
-
(सर्व फोटो बिपाशा बासूच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित