-
लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे फुलपाखरू मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली. छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
-
मालिकांबरोबरच नाटकांमध्ये काम करून तिने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
ऋताने ‘अनन्या’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. यात तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
-
‘महाराष्ट्राची क्रश’ अशी ओळख असलेल्या ऋताचा आज २९वा वाढदिवस आहे.
-
लग्नांनतरचा पहिलाच वाढदिवस ऋता तिचा पतीसह प्रतीक शाहसह साजरा करताना दिसत आहे.
-
याचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये शॉर्ट स्कर्ट आणि टॉप परिधान करून वेस्टर्न लूक केला आहे.
-
समुद्रकिनाऱ्यावरील ऋताचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
-
ऋताने दिग्दर्शक प्रतीक शाहशी १८ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली.
-
(सर्व फोटो : ऋता दुर्गुळे/ इन्स्टाग्राम)

Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा