-
अभिनेत्री राखी सावंत तिच्या बोल्ड वक्तव्यांसाठी चर्चेत असते.
-
ती अनेक विषयांवर बेधडकपणे तिचं मत मांडत असते.
-
राखीचा चित्रपटसृष्टीत येण्याचा प्रवास सोपा नव्हता.
-
राखाची कौटुंबीक परिस्थिती हलाखीची असल्याने तिचं बालपण खूप गरीबीमध्ये गेलं.
-
अगदी दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असल्याने राखीला कमी वयातच मिळेल ते काम करावं लागलं.
-
राखीने फक्त ५० रुपयांसाठी अंबानी कुटुंबातील एका लग्नात जेवण वाढलं होतं.
-
होय. राखी सावंतने अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांच्या लग्नात फक्त ५० रुपयांसाठी जेवण वाढलं होतं.
-
अनिल अंबानी आणि टीना यांचं लग्न १९९१ साली झालं. तेव्हा राखी ११ वर्षांची होती.
-
१९९७ साली आलेल्या अग्निचक्र चित्रपटात राखीने काम केलं होतं. त्यानंतर तिला अनेक चित्रपटांमध्ये लहानलहान भूमिका मिळू लागल्या.
-
राखी सावंतचं खरं नाव निरू भेदा असून ती मुंबईतील एका चाळीत कुटुंबाबरोबर राहायची.
-
घरची परिस्थिती बेताची असल्याने ती लग्नांमध्ये जेवण वाढायला जायची. तेव्ही तिला दिवसाला ५० रुपये मजुरी मिळायची.
-
बऱ्याच संघर्षानंतर इथे पोहोचलेल्या राखीचे आता मुंबईतील स्वतःचे घर आहे.
-
तिच्याजवळ बरेच फ्लॅट, कोट्यवधींची संपत्ती आणि महागड्या गाड्यादेखील आहेत.
-
तिच्या रिलेशनशिपमुळे कायम चर्चेत राहणारी राखी सध्या आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे.
-
राखी आणि आदिल एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसतात.
-
दोघंही लवकरच लग्न करणार असल्याचंही म्हटलं जातंय.
-
(सर्व फोटो राखी सावंतच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून साभार)
-
हेही वाचा – Photos: २० वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतेय ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री; एकाच मालिकेत काम करताना सहअभिनेत्याशी झालं होतं प्रेम

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…