-
‘लकी- नो टाइम फॉर लव’ या चित्रपटातून २००५ साली सलमान खानने नव्या अभिनेत्रीला लॉन्च केलं होतं. तिचं नाव होतं स्नेहा उल्लाल.
-
स्नेहा उल्लालचा चेहरा सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायशी बराच मिळता- जुळता होता.
-
सलमान आणि ऐश्वर्या यांच्या ब्रेकअपमुळे बरेच वाद झाले. दोघांचं नातं संपुष्टात आलं.
-
ऐश्वर्याशी ब्रेकअप झाल्यानंतर सलमानची नजर स्नेहावर पडली आणि त्याने तिला त्याच्या चित्रपटासाठी कास्ट केलं.
-
जेव्हा स्नेहाला प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावर पाहिलं तेव्हा ती ऐश्वर्याच असल्याचा अनेकांचा समज झाला होता.
-
स्नेहा उल्लालने ‘लकी- नो टाइम फॉर लव’नंतर ‘आर्यन’, ‘जाने भी दो यारो’, ‘क्लिक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
बॉलिवूडमध्ये तिचे चित्रपट फारसे न चालल्याने तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला.
-
काही काळ दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ती अचानक गायब झाली होती.
-
या दरम्यानच्या काळात स्नेहा एका गंभीर आजाराशी झुंज देत होती तिला ऑटोइम्यून डिसऑर्डर हा आजार झाला होता.
-
हा रक्ताशी संबंधित आजार आहे. या आजारामुळे ती एवढी अशक्त झाली होती की तिला स्वतः उठून उभं राहाणंही कठीण झालं होतं.
-
तीन वर्षं या आजारपणाचा सामना केल्यानंतर स्नेहा उल्लाल पुन्हा अभिनय क्षेत्रात परतली.
-
२०२० मध्ये तिची वेब सीरिज ‘एक्सपायरी डेट’ प्रदर्शित झाली. यातील तिच्या अभिनयचं कौतुकही झालं. (फोटो साभार- स्नेहा उल्लाल इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल