-
रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
-
आतापर्यंत या चित्रपटाने ७ मोठे रेकॉर्ड्स मोडले आहेत.
-
ब्रह्मास्त्रने रिलीजच्या पहिल्या वीकेंडमध्ये जबरदस्त कमाई करून 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश करून सुपरस्टार सलमानच्या सुलतान चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.
-
अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटाने यावर्षी सर्वात जास्त अॅडव्हान्स बुकिंग झालेल्या भुलभुलैय्या २ ला मागे टाकले आहे.
-
रणबीर कपूरच्या सर्वात मोठा ओपनर असलेला ‘संजू’चा रेकॉर्ड ब्रह्मास्त्रने मोडला आहे.
-
हा चित्रपट वर्ल्डवाइड ओपनिंग वीकेंडला आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा नंबर १ चित्रपट ठरला आहे.
-
ब्रह्मास्त्र हा तामिळनाडूमध्ये एकाच दिवसात मोठी कमाई करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.
-
परदेशातूनही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असून अमेरिका, ऑस्ट्रेलिया देशांमध्ये ‘ब्रह्मास्त्र’ची क्रेझ दिसून येत आहे.
-
ब्रह्मास्त्रने पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये ‘संजू’, ‘टायगर जिंदा है’ आणि ‘धूम 3’ ला मागे टाकले.
-
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट जगभरात ९००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.
लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल