-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या स्टाइलची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगताना दिसते.
-
सध्या अभिनेता चियान विक्रम सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण स्टाइलमुळे नाही तर एका लग्नात हजेरी लावल्यामुळे तो चर्चेत आहे.
-
विक्रमने त्याच्या घरी काम करणाऱ्या एका महिलेच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली.
-
पांढऱ्या रंगाचे धोतर आणि शर्ट असा पारंपारिक पोषाख करून त्याने लग्नकार्यात सहभाग घेतला.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार अनेकदा त्यांच्या संस्कृतीचं, पारंपारिकतेचं दर्शन कृतीतून घडवून देत असतात.
-
विक्रमच्या घरी काम करणाऱ्या ओलिमारामन यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी मेरी यांनी जवळपास ४० वर्ष अभिनेत्याच्या घरी काम केले.
-
त्यांचा मुलगा दीपक याच्या लग्नाला उपस्थित राहून विक्रमने नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देत समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
-
विक्रमचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
घरकाम करणाऱ्या महिलेच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
लवकरच विक्रम ‘पोनियन सेलवन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तू ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे.
-
(सर्व फोटो : Vamsi Kaka/ Twitter,Chiyaan Vikram/ Instagram)

Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा