-
१९८५ साली प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून मंदाकिनी यांना ओळखले जाते.
-
या चित्रपटामुळे त्या एका रात्रीत स्टार बनल्या होत्या. या चित्रपटात मंदाकिनी यांचा बोल्डनेस पाहून प्रेक्षक हैराण झाले होते.
-
राज कपूर दिग्दर्शित या चित्रपटात मंदाकिनी यांनी राजीव कपूरबरोबर महत्वाची भूमिका साकारली होती.
-
या चित्रपटात त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांनी दिलेल्या बोल्ड सीन्सचीच चर्चा अधिक रंगली होती.
-
मंदाकिनी यांनी १९८५ साली ‘मेरे साथी’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.
-
मात्र त्यानंतर त्या फारशा चित्रपटात झळकल्या नाहीत. यानंतर त्यांनी आता एका मुलाखतीत त्यांनी सिनेसृष्टीत महिलांना मिळणाऱ्या मानधनावरुन भाष्य केले आहे.
-
मंदाकिनी यांनी ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केले.
-
यात त्या म्हणाल्या, “मी सिनेसृष्टीत ज्यावेळी काम करायची त्यावेळी अभिनेत्रींना फार कमी फेम मिळायचे.”
-
“अभिनेत्री म्हणून आमच्यावर फार कमी लक्ष दिले जायचे. कित्येकदा आमचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जायचा.”
-
“इतकंच नाही तर मुख्य भूमिकेतील नायकांपेक्षा नायिकेला फार कमी किंवा काहीही महत्त्व दिलं जात नाही.”
-
“आमच्या वेळी चित्रपटातील नायिकेला फारशी मागणी दिली जात नव्हती. केवळ एखाद्या गाण्यासाठी किंवा रोमान्स करण्यासाठी तिला चित्रपटात घेतले जायचे.”
-
“संपूर्ण चित्रपटात काम करुनही तिला नायकापेक्षा मात्र कमीच मानधन मिळायचे. त्यावेळी आम्हाला फक्त दीड लाख रुपयांवर समाधान मानावे लागायचे”, असेही मंदाकिनीने म्हटले.

११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य