-
स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे.
-
या मालिकेतील जयदीप – गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या सुखाची जयदीप-गौरी आणि संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आला आहे.
-
लवकरच शिर्के पाटील कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
-
या चिमुकल्या पाहुण्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असून मालिकेत लवकरच गौरीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
-
माईंच्या आग्रहाखातर पारंपरिक पद्धतीने या डोहाळे जेवणाची तयारी करण्यात आली आहे.
-
फुलांच्या दागिन्यांनी गौरीचा साज शृंगार करण्यात आला आहे.
-
शालिनी आणि देवकी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात एक खास नृत्यही सादर करणार आहेत.
-
मात्र शुभकार्यात विघ्न आणलं नाही ती शालिनी कसली.
-
गौरीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात तिला जीवे मारण्याचा शालिनीने डाव रचलाय आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह / इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच