-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री स्नेहलता वसईकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
स्नेहलताने नुकतंच रॉयल फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
स्नेहलताने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान करत राणीसारखा पेहराव केला आहे.
-
गळ्यात नेकलेस आणि डोक्यावर फुलांचा मुकुट परिधान करत रॉयल फोटोशूट केलं आहे.
-
स्नेहलताने फोटोसाठी राणीसारख्या पोझही दिल्या आहेत.
-
तिचे रॉयल अंदाजातील फोटो पाहून नेटकऱ्यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची आठवण झाली.
-
एका चाहत्याने कमेंट करत “हुबेहुब राणी एलिझाबेथ” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “लाखो दिलांची राणी”, अशी कमेंट केली आहे.
-
स्नेहलताचे या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
स्नेहलताने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
-
ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. अनेकदा स्नेहलता तिचे फोटो शेअर करत असते.
-
(सर्व फोटो : स्नेहलता वसईकर/ इन्स्टाग्राम)

Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा