-
१९८५ साली प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून मंदाकिनी यांना ओळखले जाते.
-
या चित्रपटामुळे त्या एका रात्रीत स्टार बनल्या होत्या. या चित्रपटात मंदाकिनी यांचा बोल्डनेस पाहून प्रेक्षक हैराण झाले होते.
-
राज कपूर दिग्दर्शित या चित्रपटात मंदाकिनी यांनी राजीव कपूरबरोबर महत्वाची भूमिका साकारली होती.
-
या चित्रपटात त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांनी दिलेल्या बोल्ड सीन्सचीच चर्चा अधिक रंगली होती.
-
मंदाकिनी यांनी १९८५ साली ‘मेरे साथी’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.
-
मात्र त्यानंतर त्या फारशा चित्रपटात झळकल्या नाहीत.
-
मंदाकिनी यांनी ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत सिनेसृष्टीतील कारकिर्दीबद्दल भाष्य केले.
-
यात त्या म्हणाल्या, “आमच्या काळात मुख्य भूमिकेतील नायकांपेक्षा नायिकेला फार कमी किंवा काहीही महत्त्व दिलं जात नव्हते.”
-
“कित्येकदा आमचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जायचा.”
-
“आमच्या वेळी चित्रपटातील नायिकेला फारशी मागणी दिली जात नव्हती. केवळ काही गाण्यांपुरती किंवा रोमँटिक सीनसाठी तिला चित्रपटात घेतले जायचे.”
-
“त्याकाळी पुरुष अभिनेते चित्रपटात महिला अभिनेत्री कोण असणार हे ठरवत असे.”
-
“पुरुष नायकांना जर एखाद्या नायिकेसोबत काम करायचे नसेल तर तिला ते स्पष्ट शब्दात नकार द्यायचे.”
-
“हिला घेऊ नका, असे ते त्यावेळी स्पष्ट भाषेत सांगायचे आणि दिग्दर्शक-निर्मातेही त्यावर संमती दर्शवायचे.”
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ