-
अभिनेता शाहरुख खान याने आतापर्यंत अनेक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्याचे चित्रपट म्हणजे म्हणजे प्रेक्षकांसाठी ट्रीटच असते.
-
पण मुख्य भूमिका साकारण्याव्यतिरिक्त त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये कॅमिओ केले आहेत.
-
विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्या ‘साथिया’ या चित्रपटात शाहरुख खानने एका आदर्श पतीची छोटीशी भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
-
सलमान खान स्टारर ‘ट्यूबलाइट’मध्ये शाहरुख एका जादूगाराच्या छोट्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट अपयशी ठरला.
-
शाहरुख सलमान खानच्या ‘हर दिल जो प्यार करेगा’ या चित्रपटातील एका गाण्यातही दिसला होता.
-
शाहरुख खानने अमिताभ बच्चन यांच्या ‘भूतनाथ रिटर्न्स’मध्ये एक छोटीशी भूमिका केली होती ज्यामध्ये त्याला खूप पसंती मिळाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली.
-
‘हे बेबी’ या चित्रपटात शाहरुखचाही एक कॅमिओ होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
-
झोया अख्तरच्या ‘लक बाय चान्स’ या चित्रपटात शाहरुखची छोटीशी भूमिका होती.
-
करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात शाहरुखची छोटी भूमिका होती. ऐश्वर्याच्या माजी पतीची व्यक्तिरेखा त्याने साकारली होती.
-
आर माधवनच्या ‘रॉकेट्री’ या चित्रपटात शाहरुखही छोट्या भूमिकेत होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
-
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातील शाहरुखचा कॅमिओ लोकांना आवडला पण चित्रपट चालला नाही.
-
आणि आता शाहरुख अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर- आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातही कॅमिओ करत त्याची एक झलक दाखवत आहे.
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा