-
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाला नेपोटीजममुळे बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागला. शिवाय यामधल्या गंगूबाईच्या पात्रावरून बराच वाद झाला होता, तरी या चित्रपटाने तब्बल १३० कोटी इतकी कमाई केली.
-
कोविड काळानंतर ‘सूर्यवंशी’सारखा चित्रपट हिट करून दाखवणाऱ्या अक्षय कुमारच्या नंतर आलेला ‘बच्चन पांडे’ या चित्रपटालादेखील प्रेक्षकांचा रोष पत्करावा लागला होता. पांडे या आडनावाचा चुकीचा वापर झाल्याने काहींनी या चित्रपटाला बॉयकॉट करायची मागणी केली. याचा चांगलाच फटका चित्रपटाला बसला.
-
‘बच्चन पांडे’ पाठोपाठ अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि यालाही बॉयकॉट ट्रेंडचा चांगलाच फटका बसला. एकूणच सम्राट पृथ्वीराज यांचं चुकीचं चित्रण, प्रेमकहाणीला दिलं गेलेलं महत्त्व, अशा करणांमुळे हा चित्रपटही सपशेल आपटला. २०० कोटी इतकं बजेट असूनही या चित्रपटाने केवळ ६८ कोटीच्या आसपास एवढीच कमाई केली.
-
रणबीर कपूर, संजय दत्त, वाणी कपूर यांचा ‘शमशेरा’ हा चित्रपटदेखील असाच आपटला. चित्रपटात खलनायक पात्र हे हिंदू समाजातील प्रतिकांचा सन्मान करणारं दाखवल्याने एका विशिष्ट समूहाच्या भावना दुखावल्या गेल्याने या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.
-
अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट या बॉयकॉटचा हकनाक बळी ठरला. आमिरच्या चित्रपटाबरोबरच प्रदर्शित झाल्याने आणि प्रेक्षकांचा बॉलिवूडवरचा राग अनावर झाल्याने या चित्रपटालासुद्धा लोकांनी बॉयकॉट केलं.
-
‘फॉरेस्ट गम्प’चा रिमेक म्हणून आमिर खानने सादर केलेल्या ‘लाल सिंह चड्ढा’ला या बॉयकॉटचा चांगलाच फटका बसला, कलाकारांचे जून व्हिडिओज शेअर करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले गेले. आमिरने माझा चित्रपट बॉयकॉट करू नका असं म्हणत माफी मागितली तरी त्याचा काहीच फायदा झाला नाही. आमिरच्या कारकीर्दीतला हा चित्रपट सर्वात मोठा फ्लॉप ठरला.
-
‘लाइगर’ मधून दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाने हिंदीत पदार्पण केलं. पण प्रमोशन दरम्यान त्याने आणि अभिनेत्री अनन्या पांडेने दिलेल्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रेक्षकांनी या चित्रपटालाही बॉयकॉट केलं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फक्त ३६ कोटी इतकी कमाई केली.
-
गेले काही दिवस ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ हा ट्रेंड चांगलाच व्हायरल झाला होता. बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट म्हणून याकडे पाहिलं जात होतं. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही बरेच वाद झाले. पण या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. एकूणच हिंदी चित्रपटाच्या बुडत्या नावेला वाचवण्यात ‘ब्रह्मास्त्र’ यशस्वी झाला आहे. ४०० कोटी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात २०० कोटीहून अधिक कमाई केली आहे.
-
‘लाल सिंह चड्ढा’ आणि ‘ब्रह्मास्त्र’सारख्या चित्रपटांचं कौतुक केल्याने अभिनेता हृतिक रोशनच्या आगामी चित्रपटाला म्हणजेच ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाला बॉयकॉट करायची मागणी सोशल मीडियावर होत आहे. हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून हृतिकबरोबरच सैफ अली खानही यामध्ये मुख्य भूमिकेत आहे.
-
चांगल्या आणि वाईट कर्मांचा हिशोब ठेवणाऱ्या ‘चित्रगुप्ताचं विनोदी चित्रीकरण केल्याने अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी ‘थॅंक गॉड’ हा चित्रपट अडचणीत आला आहे. कुवैतमध्ये या चित्रपटावर बंदी घातली असून आपल्या देशातही या चित्रपटाला बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”