-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकने ‘धर्मवीर’, ‘चंद्रमुखी’ हे चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
-
प्रसाद ओक पुन्हा एकदा त्याच्या दिग्दर्शनाने सजलेला मराठी चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
त्याच्या नवीन चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘सुटका’ असं प्रसाद ओकच्या नवीन चित्रपटाचं नाव आहे.
-
या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील लाडका अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
प्रसाद ओकच्या नव्या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका अभिनेत्री प्रार्थना बेहेरे साकारताना दिसणार आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील विनोदवीर ओंकार राऊतही प्रसादच्या नव्या चित्रपटात झळकणार आहे.
-
ओंकारने नाटकापासून त्याच्या कलाविश्वातील कारकिर्दीला सुरुवात केली.
-
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे. ‘फ्रेशर्स’ या मालिकेत साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती.
-
मालिकांप्रमाणेच वेब सीरिजमध्येही ओंकार झळकला आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या ‘काळे धंदे’ या वेब सीरिजमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
ओंकारने ‘टाइमपास’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. या चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘टाइमपास ३’ मध्ये तो दगडूच्या मित्राच्या भूमिकेत दिसला.
-
आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ओंकार सज्ज झाला आहे.
-
अभिनेत्याबरोबरच तो एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शकही आहे.
-
सध्या ओंकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमध्ये विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
-
(सर्व फोटो : ओंकार राऊत /इन्स्टाग्राम)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच