-
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट हा चित्रपट घराघरात लोकप्रिय आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ६ वर्ष उलटली आहे. मात्र अजून या चित्रपटाची क्रेझ कायम आहे.
-
या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्यासोबतच प्रिन्सची भूमिकाही गाजली. मात्र आता अभिनेता सूरज पवार हा अडचणीत सापडला आहे.
-
मंत्रालयात नोकरीचं आमिष देऊन शिर्डीतील एका व्यक्तीला फसवल्याचा आरोप सूरजवर करण्यात आला आहे.
-
त्यामुळे त्याला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीत हा फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
सूरज हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पोफळज गावचा आहे. या चित्रपटामुळे तो देशभरात प्रसिद्ध झाला.
-
काही दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतही त्याने ‘झुंड’मध्ये स्क्रीन शेअर केली आहे. ‘झुंड’मध्ये त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.
-
नागराज मंजुळे यांच्या ‘पिस्तुल्या’ या लघुचित्रपटातून सूरज यांच्या चित्रपट करिअरला सुरुवात झाली.
-
‘पिस्तुल्या’मध्ये पारधी समाजातील मुलगा, ‘फँड्री’तील जब्याच्या मित्राची भूमिका सूरजने साकारली होती.
-
सूरजने वयाच्या केवळ १५ व्या वर्षी खलनायकाची भूमिका साकारली होती.
-
सूरजने शिक्षकांच्या भीतीने शाळा अर्धवट सोडली होती. पण आईच्या निधनानंतर त्याने पुन्हा शिक्षण सुरु केलं आहे. तो सध्या नागराज मंजुळेंसोबत पुण्याला राहत आहेत.
-
‘पिस्तुल्या’मध्ये पारधी समाजातील मुलगा, ‘फँड्री’तील जब्याचा मित्र आणि ‘सैराट’मधील आर्चीचा भावाच्या भूमिकेनंतर सुरज खूपच प्रसिद्ध झाला.
-
सूरजने नागराज मंजुळे यांच्या सर्व चित्रपटात काम केलं आहे. त्यामुळे तो लाडका असल्याचे बोललं जात आहे.
-
सूरजला आई-वडील नसल्याने तो ९-१० वर्षांपासून नागराज यांच्या कुटुंबासोबत पुण्यात राहत आहे.
-
नागराज मंजुळे यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात तो झळकला आहे.
-
माझ्यासाठी अण्णा म्हणजे नागराज मंजुळे सर्वकाही आहेत, असे त्याने अनेकदा मुलाखतीत म्हटले आहे.
-
सूरजचा ‘घर, बंदूक, बिर्याणी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.
-
पण अहमदनगर त्या घटनेमुळे तो अडचणीत आला आहे. तो या प्रकरणी सहभागी आहे की नाही हे चौकशीनंतर समोर येईल.
-
मात्र आता त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे हे दिसत आहे.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं