-
अभिनेता सलमान खान बॉलिवूडचा ‘दबंग’ म्हणून ओळखला जातो.
-
सलमान गेली अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे.
-
त्याचे अनेक चित्रपट लोकप्रिय ठरले आहेत.
-
त्याचे फॅन फॉलोइंग तूफान आहे.
-
अनेकांना त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते.
-
सलमान खानने आजवर अनेक नवोदित अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये लाँचही केले आहे.
-
परंतु अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांनी सलमान खानबरोबर काम करायला स्पष्टपणे नकार दिला आहे.
-
स्वतः सलमानने चित्रपटाची विचरणा केलेली असूनही अनेकींनी त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला नकार दिला.
-
ऐश्वर्या राय :
सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे दोघं ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात झळकले. यात त्यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटादरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण नंतर त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने ते वेगळे झाले. त्यांच्या प्रेम प्रकरणाची खूप चर्चा झाली होती. पण पुन्हा कधीही त्यांनी एकत्र काम केलं नाही. -
दीपिका पदुकोण :
दीपिका पदुकोण हिला सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’, ‘किक’ या चित्रपटांसाठी विचारणा करण्यात आली होती तेव्हा तिने या चित्रपटात कान करायला नकार दिला. -
सोनाली बेंद्रे :
सोनाली बेंद्रे आणि सलमान खान यांनी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटात स्क्रीन शेअर केला होता.पण या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात सलमानने काळविटाची शिकार केली आणि ते प्रकरण खूप चर्चेत आलं. त्यानंतर सोनालीने कधीही सलमानबरोबर काम केलं नाही. -
कंगना रणौत :
सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सुलतान’ या चित्रपटात कंगना रणौतला प्रमुख भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. पण कंगनाने या चित्रपटात काम करायला नकार दिला.

११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य