-
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
आलिया-रणबीरने नुकतीच त्यांचा बॉडीगार्ड युसुफ इब्राहिमच्या कुटुंबियांची भेट घेतली. युसुफने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आलिया-रणबीरबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोला त्याने ‘फॅमिली अस्र’ असं कॅप्शन देत आलिया-रणबीरला टॅग केलं आहे.
-
बॉडीगार्डच्या कुटुंबियाबरोबरच्या आलिया-रणबीरच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
गेल्या अनेक वर्षांपासून युसुफ आलियाचा बॉडीगार्ड आहे. आलियाप्रमाणेच रणबीरच्या सुरक्षा रक्षकाची जबाबदारीही त्याच्यावर आहे.
-
आलिया-रणबीरबरोबर युसुफ इब्राहिम अनेकदा सुरक्षा रक्षक म्हणून दिसला आहे. तो नेहमी सावलीप्रमामे त्यांच्यासोबत असतो.
-
‘ब्रह्मास्र’च्या अनेक प्रमोशनच्या कार्यक्रमादरम्यानही रणबीर-आलियाचं संरक्षण करताना युसुफ दिसला होता.
-
रणबीर आणि युसुफच्या कुटुंबियांचा खास फोटो.
-
याआधीही त्याने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षा रक्षकाची जबाबदारी सांभाळली आहे.
-
वरुण धवन, सनी लिओनी, आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे या सेलिब्रिटींच्या सुरक्षा रक्षक म्हणून तो काम पाहत होता.
-
(सर्व फोटो : युसुफ इब्राहिम/ इन्स्टाग्राम)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…