-
अभिनेते अमिताभ बच्चन यांचे नाव सगळ्यात जास्त संपत्ती असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्यांच्या यादीत येते.
-
आता पुन्हा एकदा त्यांनी मुंबईत एक आलिशान असं नवीन घर घेतलं आहे.
-
त्यांनी एका गगनचुंबी इमारतीमध्ये १२००० स्क्वेअर फुटांचा फ्लॅट घेतला आहे. पार्थेनॉन सोसायटीच्या ३१ व्या मजल्यावर त्यांनी ही मालमत्ता खरेदी केली आहे.
-
परंतु अमिताभ इथे राहणार नाहीत. त्यांनी गुंतवणुकीसाठी ही मालमत्ता खरेदी केली असल्याचे सांगितले जात आहे.
-
आधीच अमिताभ बच्चन यांची मुंबईत ६ घरं आहेत.
-
१० हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या पहिल्या ‘जलसा’ या बंगल्यात ते त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात.
-
‘प्रतीक्षा’ हे त्यांच्या दुसऱ्या बंगल्याचं नाव आहे. तिथे ते ‘जलसा’मध्ये राहायला येण्यापूर्वी त्यांच्या आई-वडिलांसोबत राहत होते.
-
त्यांच्या तिसरा बंगल्याचं नाव ‘जनक’ आहे. त्या बंगल्यात त्यांचे ऑफिस आहे.
-
‘वत्स’ हा त्यांचा चौथा बंगला. तर २०१३ मध्ये त्यांनी ‘जलसा’ च्या मागे ६० कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता.
-
अमिताभ बच्चन यांनी गेल्या वर्षी एक आलिशान डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला होता.
-
अभिनेत्री क्रिती सेनॉनला डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने दिली आहे. त्याचे ते एका महिन्याचे १० लाख रुपये भाडे घेत आहेत.
-
लोखंडवाला रोडवरील अटलांटिस इमारतीच्या २७व्या आणि २८व्या मजल्यावर हा डुप्लेक्स आहे.
फोटो सौजन्य : अमिताभ बच्चन (इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख