-
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियाद्वारे नेहमीच चाहत्यांशी संवाद साधताना दिसते.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून तिने सध्या ब्रेक घेतला आहे.
-
आपण लंडनला जात असल्याचं प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामद्वारे फोटो पोस्ट करत सांगितलं.
-
लंडनमध्ये ती आपल्या आगामी मराठी चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे.
-
संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्त्ववादी या कलाकारांसह ती लंडनमध्ये चित्रीकरण करत आहे.
-
यादरम्यानचे काही फोटोदेखील तिन शेअर केले आहेत.
-
पण आता तिने शेअर केलेली एक पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
प्राजक्ताने तिचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. पण या फोटोंना दिलेलं कॅप्शन विशेष लक्षवेधी आहे.
-
“मैं जहाँ रहूँ मैं कहीं भी हूँ तेरी याद साथ है…(गैरसमज नसावा , प्रिय भारताला उद्देशून म्हणतेय..)” असं प्राजक्ताने फोटो शेअर करताना म्हटलं आहे.
-
कोणत्याही देशामध्ये असो भारताची आठवण कायम आपल्याबरोबर आहे असं प्राजक्ताचं म्हणणं आहे.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
![famous actress Parvati Nair got engaged to businessman Aashrith Ashok](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/famous-actress-Parvati-Nair-got-engaged-to-businessman-Aashrith-Ashok.jpg)
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न