-
‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ अशी ओळख असलेला अभिनेता गौरव मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचला.
-
विनोदीबुद्धी आणि अभिनय कौशल्याने त्याने अल्पावधीतच कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
विनोदवीर गौरव ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतो. अनेकदा त्याच्या कामाची पावती म्हणून परिक्षकांकडून त्याला कौतुकाची थापही मिळते.
-
गौरवचा चाहता वर्ग मोठा असून त्याने अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे.
-
गौरव लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. एका मराठी चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘हवाहवाई’ असं या चित्रपटाचं नाव असून महेश टिळेकर यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
-
या चित्रपटात गौरव दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
-
‘हवाहवाई’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ७ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘द ग्रेट इंडियन किचन’ फेम दाक्षिणात्य अभिनेत्री निमिषा सजयन ‘हवाहवाई’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
-
या चित्रपटात ती मुख्य नायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
‘हवाहवाई’ चित्रपटाची कथा मध्यमवर्गीय गृहिणीच्या स्वप्नपूर्तीकडे होणाऱ्या संघर्षमय प्रवासावर आधारित आहे.
-
चित्रपटात गौरव मोरेसह अभिनेता समीर चौघुले, सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री वर्षा उसगावकर हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
-
गौरव मोरेला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.
-
(सर्व फोटो : गौरव मोरे/ इन्स्टाग्राम, आयएमडीबी)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…