-
बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे.
-
या शोचे १६वे पर्व लवकरच सुरू होणार असून यावेळी कोणते स्पर्धक असतील, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
-
बिग बॉसच्या घरात एक जेल आहे आणि काही स्पर्धकांना जेलमध्ये पाठवलं जातं. पण बिग बॉसमधील काही स्पर्धक असेही आहेत, ज्यांनी केवळ शोमध्ये नाही, तर वैयक्तिक आयुष्यातही जेलची हवा खावी लागली आहे.
-
या यादीत सर्वात पहिलं नाव येतं ते अरमान कोहलीचं. अरमानला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एक वर्ष तुरुंगात राहावं लागलं होतं. आताच त्याची जामीनावर सुटका झाली आहे.
-
जातीवाचक शब्दांचा वापर केल्याप्रकरणी युविका चौधरीला अटक करण्यात आली होती.
-
दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला वेगाने गाडी चालवत दुसऱ्या कारला धडक दिल्याप्रकरणी २०१८मध्ये अटक करण्यात आली होती.
-
‘बिग बॉस १२’ चा भाग असलेला क्रिकेटर श्रीशांतला २०१३मध्ये राजस्थान रॉयलच्या दोन सहकाऱ्यांसह IPLच्या सहाव्या हंगामात मॅच फिक्सिंगसाठी अटक करण्यात आली होती.
-
बिग बॉसमधील सर्वात वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओमला तुरुंगात जावं लागलं होतं. . महिलांची वादग्रस्त छायाचित्रे दाखवून पैसे उकळणे आणि सायकल चोरी केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.
-
तुरुंगात जाणाऱ्यांमध्ये राहुल महाजन यांचेही नाव आहे. ‘बिग बॉस २’ चा भाग असलेल्या राहुल महाजनला ड्रग्ज घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
-
‘बिग बॉस ६’ चा भाग राहिलेले प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि असीम त्रिवेदी यांनीही खऱ्या आयुष्यात तुरुंगवास भोगलाय. व्यंगचित्राद्वारे संसद, राष्ट्रचिन्ह आणि राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
-
बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या मोनिका बेदीनेही तुरुंगाची हवा खाल्ली आहे. अभिनेत्री बनावट कागदपत्रे वापरून पोर्तुगालमध्ये गेली होती.
-
‘बिग बॉस ४’ चा भाग असलेली सीमा परिहार खऱ्या आयुष्यात एक डकैत होती. वृत्तानुसार, सीमावर ३० घरं लुटल्याचा आणि ७० हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप होता.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल