-
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा आज वाढदिवस. तिने‘रेफ्युजी’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं.
-
करीनाने तिच्या कारकिर्दीत अनेक आव्हानात्मक भूमिकाही स्विकारल्या आहेत. ती तिच्या चित्रपटासाठी फार मेहनत घेते.
-
करीना ही नेहमी फार बिनधास्तपणे तिचे मत व्यक्त करताना दिसते. ती सैफ अली खानचे आणि तिच्या मुलांबद्दल नेहमी काही ना काही तरी पोस्ट शेअर करत असते.
-
बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आणि पती सैफ अली खान यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
-
विशेष म्हणजे तैमुर आणि जेह याच्यासोबतच ती सारा आणि इब्राहिमची विशेष काळजी घेताना दिसते.
-
करीना आणि सैफ हा २०१२ सालामध्ये लग्नबंधनात अडकले होते. करीनाने २०१६ मध्ये तैमूरला जन्म दिला होता.
-
तर २०२१ मध्ये तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्याचे नाव जहांगीर असे आहे.
-
तर सैफ अली खानला त्याची पहिली पत्नी अमृता सिंहपासून सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत.
-
सारा अली खान आणि जहांगीर यांच्यात २५ वर्षांचा फरक आहे. सैफ अली खानला पहिल्या पत्नीपासून दोन आणि दुसऱ्या पत्नीपासून दोन अशी एकूण चार मुलं आहेत.
-
काही दिवसांपूर्वी करीना कपूर ही पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
-
ती लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत असताना तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप दिसत असल्याने ती पुन्हा गरोदर असल्याचे बोललं जात आहे. मात्र नुकतंच करीनाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
-
करीना कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिने ती पुन्हा गरोदर नसल्याचे स्पष्ट केले होते.
-
“मी गरोदर नाही. हा सर्व पास्ता आणि वाईनचा परिणाम आहे” असे करीनाने म्हटले.
-
त्यापुढे ती म्हणाली, सैफच्या मते त्याने आधीच देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी खूप योगदान दिले आहे.
-
करीनाच्या या स्पष्टीकरणादरम्यान सैफबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली होती.
VIDEO: बापरे भयंकर अपघात! वाशीमध्ये भर रस्त्यात ट्रकचा टायर फुटला अन् होत्याचं नव्हतं झालं; रिक्षाची अवस्था बघून घाम फुटेल