-
आपल्या खुसखुशीत विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे स्टॅंडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी(२१ सप्टेंबर) निधन झाले.
-
वयाच्या ५८व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृद्यविकाराचा झटका आल्यामुळे १० ऑगस्टपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
-
अखेर महिनाभराहून अधिक काळ त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
-
कॉमेडियन राजू श्रीवास्तव ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोमधून घराघरात पोहोचले. विनोदबुद्धी आणि अभिनय कौशल्याने त्यांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवलं.
-
कॉमेडी शोबरोबरच त्यांनी अनेक चित्रपटातही काम केलं आहे. ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.
-
याशिवाय त्यांनी जाहिरातींतही काम केलं आहे. त्यांनी अनेक अवॉर्ड शो होस्टही केले आहेत.
-
१७ मे १९९३ रोजी त्यांनी पत्नी शिखाशी लग्नगाठ बांधली. त्यांना आयुषमान आणि अंतरा ही दोन मुले आहेत.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका शोसाठी ते ४ ते ५ लाख रुपये मानधन घ्यायचे.
-
राजू श्रीवास्तव यांचं कानपूर या मूळ गावी आलिशान घर आहे.
-
त्यांची एकूण संपत्ती १५-२० कोटी इतकी आहे. महिन्याला ते जवळपास ५-१० लाख रुपयांची कमाई करायचे.
-
मीडिया रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव यांच्याकडे इनोवा, बीएमडब्ल्यु ३, मर्सिडीज आणि ऑडी क्यू ७ या महागड्या गाड्याही आहेत. (सर्व फोटो : इंडियन एक्पप्रेस)
Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित