-
आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झालं आहे. ते ५८ वर्षांचे होते.
-
दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली.
-
१० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव यांना लगेचच रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं.
-
गेले ४० दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या प्रकृतीबाबत सतत त्यांचे कुटुंबीय माहिती देत होते.
-
राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयामध्ये भरती केल्यानंतर लगेचच त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली. १० ऑगस्टला व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं.
-
यादरम्यान ते अचानक खाली कोसळले. रुग्णालयामध्ये भरती केल्यानंतर त्यांची प्रकृती आणखीनच खालावत गेली.
-
हळूहळू त्यांच्या मेंदूनेही काम करणं बंद केलं. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी राजू यांच्या व्हेंटिलेटरचा पाइप देखील बदलला.
-
त्यांना इन्फेक्शन होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. शिवाय राजू यांना कोणत्याच प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून पत्नी शिखा आणि मुलगी अंतरालाही त्यांना भेटता येत नव्हतं. राजू यांना मध्येच ताप देखील येत होता.
-
पण राजू श्रीवास्तव यांच्याबाबत एक नवी माहिती समोर आली आहे.
-
गेल्या १० वर्षांमध्ये राजू श्रीवास्तव यांची तब्बल तीनवेळा अँजिओप्लास्टी करण्यात आली.
-
दहा वर्षांपूर्वी कोकिलाबेन रुग्णालयामध्ये पहिल्यांदा त्यांच्या अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
-
त्यानंतर पुन्हा सात वर्षांनी मुंबईमधील लिलावती रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. तेव्हासुद्धा अँजिओप्लास्टीच करण्यात आली.
-
आतासुद्धा जेव्हा त्यांना रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं तेव्हा राजू श्रीवास्तव यांची अँजिओप्लास्टी करावी लागली. त्यानंतर त्यांच्या मेंदुनेही काम करणं बंद केलं. अखेरीस बुधवारी सकाळी रुग्णालयामध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक