-
आपल्या विनोदांनी लोकांना खळखळून हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांची बुधवारी प्राणज्योत मालवली. राजू यांच्या आयुष्यामध्ये अमिताभ बच्चन याचे खूप महत्त्व होते. अमिताभ यांची मिमिक्री केल्यानंतरच्या एका घटनेमुळे त्यांचे आयुष्य बदलले.
-
राजू श्रीवास्तव मुळचे कानपूरचे होते. मुंबईला येण्यापूर्वी कानपूरमध्ये असताना ते अनेक कार्यक्रमांमध्ये मिमिक्री करायचे.
-
कानपूर शहरामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये राजू अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करायचे. या कार्यक्रमांसाठी पैसे घेऊयात असा विचार त्यांच्या मनात कधीही आला नाही.
-
अशाच एका कार्यक्रमामध्ये मिमिक्री करायला ते गेले होते. सादरीकरण झाल्यानंतर आयोजकांनी त्यांना ५० रुपये देऊ केले.
-
येण्या-जाण्याच्या खर्चासाठी असल्याचे आयोजकांनी पैसे दिले आहेत असे त्यांना वाटले. तेव्हा ते स्वखर्चाने त्या आयोजकाच्या घरी पोहोचले आणि दिलेले पैसे परत घेण्यासाठी आग्रह केला.
-
मी तुम्ही दिलेले ५० रुपये परत करायला आलो आहे असे त्यांनी त्या आयोजकाला सांगितले. तेव्हा मी तुला तुझ्या सादरीकरणासाठी पैसे दिले होते, असे त्याने स्पष्ट केले.
-
त्यादिवशी लोकांना हसवूनसुद्धा पैसे कमावता येतात ही गोष्ट राजू यांना कळली. या एका घटनेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
-
काही दिवसांनी राजू श्रीवास्तव यांनी कानपूर सोडून मुंबई गाठली. मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी खूप नाव कमावले.
-
राजू श्रीवास्तव यांनी राजकारणामध्येही प्रवेश केला होता. ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य होते. त्याआधी ते समाजवादी पार्टीमध्ये होते.
-
“द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेज” या कार्यक्रमामुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली होती.
-
त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वामध्ये न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
-
पंतप्रधान मोदींसह मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकारांनी राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. फोटो सौजन्य – राजू श्रीवास्तव फेसबुक

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल