-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिला ओळखले जाते.
-
समांथाच्या सौंदर्यासह लाखो चाहते आहेत. तिने तिच्या सौंदर्याबरोबर अभिनय कौशल्याने एक वेगळी छाप पाडली आहे.
-
तिने ‘ये माया चेसवे’ या चित्रपटातून २०१० साली टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
सध्या ती तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे.
-
मात्र नुकतंच समांथाने प्रकृती अस्वास्थ्यामुळे समांथाने ‘खूशी’ शूटिंगमधून ब्रेक घेतला असून उपचारासाठी ती अमेरिकेत गेली आहे.
-
तिला एका गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून समांथा ही त्वचेशी संबंधित आजाराने त्रस्त आहे.
-
‘पॉलीमॉर्फ्स लाइट एरप्शन’ असे या आजाराचे नाव आहे. हा आजार सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात आल्यामुळे होतो.
-
या आजारामुळे समांथा ही कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाही. नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमातही ती कुठेच दिसली नाही.
-
समांथाला तज्ज्ञ डॉक्टरांनी कामातून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे.
-
Polymorphous light eruption असे या आजाराचे नाव आहे.
-
या आजारात सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावर किंवा त्वचेवर पुरळ येतात.
-
या आजारामुळे चेहऱ्यावर आणि त्वेचवर लाल चट्टे किंवा पुरळ पाहायला मिळतात.
-
उन्हाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा सूर्यप्रकाशात वाढ होते. सूर्यप्रकाश वाढल्यानंतर बऱ्याचदा हा आजार होण्यास सुरुवात होते.
-
हा आजार साधारणत: १८ ते २० च्या दरम्यान सुरु होतो. याला पॉलिमॉर्फिक लाइट इरप्शन, सन ऍलर्जी आणि सन पॉइझनिंग असेही म्हणतात.
-
अनेकदा हा आजार १० दिवसांच्या आत बरा होतो.
-
पण गंभीर किंवा सतत पुरळ येत असलेल्या लोकांना औषधोपचाराची आवश्यकता भासू शकते.

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित