-
नागिन फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश चांगलीच लोकप्रिय आहे.
-
सध्या ती अभिनेता आणि होस्ट करण कुंद्राबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.
-
दोघेही एकमेकांचे फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. तेजस्वीने नुकतेच गोव्यात नवीन घर घेतले आहे. याबद्दल करणने इन्स्टाग्रामवरून माहिती दिली.
-
तेजस्वीने गोव्यात घर खरेदी केल्याबद्दल करणने इन्स्टा स्टोरीतून तिचं अभिनंदन केलं. पण गोव्यात स्वतःचं घर असणारी तेजस्वी ही पहिली कलाकार नाही.
-
अक्षय कुमारचं गोव्यात घर असून त्याची किंमत पाच कोटी असल्याचं म्हटलं जातंय.
-
अभिनेता अभय देओलचंही गोव्यात स्वतःचं आलिशान घर आहे.
-
इम्रान हाश्मीचं गोव्यातील बागा बीचजवळ घर आहे.
-
अभिनेत्री मलायका अरोरा खानदेखील या यादीत असूनही तिचंही गोव्यात सुंदर असं घर आहे.
-
देसी गर्ल प्रियंका चोप्राचा बागा बीचजवळ बंगलो आहे.
-
पुजा बेदीदेखील गोव्यात एक आलिशान घराची मालकीण आहे.
-
अभिनेता आफताब शिवदासानी याचंही गोव्यात घर आहे.
-
क्रिकेटर युवराज सिंगनेही अलिकडेच गोव्यात आलिशन घर खरेदी केलंय. (सर्व फोटो – प्रत्येक सेलिब्रिटीच्या इन्स्टाग्रामवरून साभार)
Champions Trophy Final: भारताच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, यजमान देशात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना