-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परबने आपल्या विनोदी शैलीने कमी काळामध्येच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
-
शिवाली या कार्यक्रमामध्ये साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खळखळून हसवतं. तिच्या चाहत्यावर्गामध्येही वाढ झाली आहे.
-
तसेच शिवाली सोशल मीडियावरही फारच सक्रिय असते.
-
आपले विविध फोटो तसेच डान्स व्हिडीओ शेअर करत ती आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते.
-
सोशल मीडियावर तर तिचे हजारो फॉलोवर्स आहेत.
-
सतत फोटोशूटमध्ये रमणाऱ्या या अभिनेत्री नुकतंच एक हटके फोटोशूट केलं.
-
तिच्या याच फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
-
शिवालीने कोणत्या स्टुडिओमध्ये किंवा सेटवर नव्हे तर चक्क बाथटबमध्ये फोटोशूट केलं.
-
या फोटोशूटसाठी तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. पण तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.
-
बाथटबमध्ये पाणीच नाही, पाणीटंचाई आहे का?, साधरणपणे ही आंघोळ करायची जागा दिसत आहे, एवढा दुष्काळ की रिकाम्या बाथटबमध्ये बसावं लागत आहे अशा अनेक हास्यास्पद कमेंट नेटकऱ्यांनी शिवालीच्या फोटोंवर केल्या आहेत.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं