-
फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण.
-
दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
शूटिंगच्या व्यतिरिक्तही चित्रपट महोत्सवांच्या निमित्ताने तिचे परदेश दौरे सतत सुरु असतात.
-
तर दुसरीकडे, अभिनेत्री उर्वशी रौतेलाही बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय राहून ती आपल्या आयुष्यातल्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करते.
-
अत्यंत मनमोकळ्या स्वभाव असलेली उर्वशी पटकन समोरच्या व्यक्तीशी मैत्री करू शकते.
-
त्याचप्रमाणे दीपिका पदुकोणही तिच्या दिलखुलास स्वभावामुळे प्रसिद्ध आहे.
-
या दोघी नुकत्याच एका विमानप्रवासादरम्यान एकमेकींना अचानक भेटल्या.
-
दुबईहून मुंबईत या दोघीही एकाच विमानातून परतत होत्या.
-
आपल्या विमानात दीपिका आहे हे उर्वशीला कळल्यावर ती दीपिकाकडे गेली आणि तिला घट्ट मिठी मारली. तसेच तिने दीपिकाच्या गालावर किसही केले.
-
दीपिकाही उर्वशीशी छान हसून बोलली. दोघींच्यात छान गप्पा झाल्या.
-
दोन आघाडीच्या अभिनेत्री एकमेकींशी नीट बोलत नाहीत हा सगळ्यांचा समज या दोघींनी पुसून काढला.
रामनवमीला निर्माण होतो आहे दुर्मिळ संयोग, ‘या’ ३ राशींच्या लोकांवर होईल प्रभु श्री रामाची कृपा