-
तीस वर्षांपासून काश्मीरमध्ये असलेली सिनेमागृहे बंद होती. काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पहिले मल्टीप्लेक्स सिनेमागृह बांधण्यात आले आहे. या मल्टीप्लेक्समध्ये ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Express Photo by Shuaib Masoodi)
-
आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट काश्मीरमध्ये तीन दशकानंतर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट आहे. आमिरच्या या चित्रपटातील काही भाग काश्मीरमध्ये चित्रीत करण्यात आले होते. (Instagram – aamirkhanproductions)
-
आयनॉक्स आणि श्रीनगरमध्ये स्थित एका व्यावसायिक कुटुंबाने एकत्र येत या प्रकल्पाची योजना आखली होती. (Express Photo by Shuaib Masoodi)
-
त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरायला चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला. (Express Photo by Shuaib Masoodi)
-
मंगळवारी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या मल्टीप्लेक्सचे उद्घाटन केले. (Express Photo by Shuaib Masoodi)
-
उद्घाटन झाल्यानंतर ३० सप्टेंबरपासून या मल्टीप्लेक्समध्ये असलेल्या तीनपैकी दोन स्क्रीन्सवर चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहे. पुढे थोड्यात कालावधीमध्ये तिसऱ्या स्क्रीनचे काम सुरु केले जाईल. (Express Photo by Shuaib Masoodi)
-
सैफ अली खान आणि हृतिक रोशन यांचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट या मल्टीप्लेक्समध्ये ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. (Instagram – hrithikroshan)
-
श्रीनगरमध्ये स्थित काश्मीरमधल्या पहिल्या मल्टीप्लेक्सचे बांधकाम सुरु असतानाचे दृश्य (Express Photo by Shuaib Masoodi)
-
काही दिवस चित्रपटाचे तिकीट काढण्यासाठी लोकांना प्रत्यक्ष तिकीट काउंटरवर जावे लागणार आहे. प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन तिकीट सेवा थोड्याच दिवसांमध्ये सुरु होणार आहे. (Express Photo by Shuaib Masoodi)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”