-
अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
-
आपला मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर ती नेहमीच बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.
-
तिने आपलं नातं कधीच कोणापासून लपून ठेवलं नाही. नेहमीच उघडपणे नुपूरबरोबर असलेल्या नात्याचा तिने स्वीकार केला.
-
एकमेकांना डेट करणारं हे कपल आता लवकरच अधिकृतरित्या विवाहबंधनात अडकणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.
-
नुपूर हा एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आहे. अनेक सेलिब्रिटी मंडळींचा तो फिटनेस ट्रेनर आहे.
-
नुपूर सध्या सुरु असलेल्या आयर्न मॅन इटली स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहे. या स्पर्धेदरम्यान त्याने गुडघ्यावर बसून आयराला चक्क प्रपोझ केलं.
-
यावेळी आयराने अगदी हसत त्याला होकार दिला. या दोघांचा एकमेकांना प्रपोझ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे.
-
पण याआधीही नुपूर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला होता.
-
नुपूरने जवळपास तीन वर्षांपूर्वी चक्क न्यू़ड फोटोशूट केलं होतं. ज्याची सर्वत्र चर्चा रंगली.
-
एका बंद खोलीत नव्हे तर खुल्या जागेमध्ये त्याने हे फोटोशूट केलं होतं.
-
त्याच्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये तो कधी धावताना तर कधी हवेमध्ये उडी मारताना दिसत आहे.
-
इतकंच नव्हे तर या फोटोशूटदरम्यान त्याने अंगावर एक कपडादेखील परिधान केला नव्हता.
-
आमिर खानचा हा होणारा जावई पण भलताच फिट आणि दिसायला अगदी स्मार्ट आहे.
-
जवळपास दोन वर्ष तो अभिनेता सुष्मिता सेनचादेखील फिटनेस ट्रेनर होता. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं