-
‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. याच मालिकेतून अभिनेत्री अक्षया नाईक घराघरात पोहोचली.
-
या मालिकेत अक्षया ‘लतिका’ ही मूख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. मालिकेचे कथानक रंजक वळणावर असताना अक्षयाच्या फोटोशूटने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
अक्षयाने ब्रालेट टॉप आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसून बोल्ड फोटोशूट केलं आहे.
-
कानात झुमके, हातात बांगड्या आणि मोकळ्या केसांनी स्टाइल करत खास लूक केला आहे. अक्षयाने केसांत सदाफुली माळली आहे.
-
तिचा हा खास लूक डिझायनर स्टायलिस्ट देविका मांजरेकरने डिजाइन केला आहे.
-
अक्षयाने फोटोसाठी हटके पोझ दिल्या आहेत. बाल्कनीत केलेलं हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
-
अक्षयाने मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.
-
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली. मालिकेत अक्षयाने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
-
अक्षयाचा चाहता वर्ग मोठा आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा ती तिचे फोटो शेअर करत असते.
-
(सर्व फोटो : देविका मांजरेकर,अक्षया नाईक/ इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख