-
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप गरूडझेप’ हा चित्रपट विजयादशमीच्या मुहूर्तावर ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
-
सध्या सोशल मीडियावर ‘शिवप्रताप गरूडझेप’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे.
-
‘आग्र्याहून सुटका’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग या चित्रपटात दाखवला जाणार आहे.
-
या चित्रपटात अभिनेते डॉ. अमोल कोल्हे ‘छत्रपती शिवाजी महाराजां’ची भूमिका साकारणार आहेत.
-
‘राजमाता जिजाऊ’ यांची भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर साकारणार आहे.
-
बाल कलाकार हरक अमोल भारतीय ‘शंभूराजे’ यांची भूमिका साकारणार आहे.
-
अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी चौफेर नाव असलेली मनवा नाईक या चित्रपटात ‘सोयराबाई मोहिते’ यांची भूमिका साकारणार आहे.
-
अभिनेता अजय तपकिरे ‘बहिर्जी नाईक’ यांची भूमिका साकारणार आहे.
-
‘पुतळा राणीसाहेब’ यांची भूमिका अभिनेत्री पल्लवी वैद्य साकारणार आहे.
-
‘मिर्झाराजे जयसिंह’ यांची भूमिका अभिनेता शैलेश दातार साकारणार आहे.
-
अभिनेत्री अलका बडोला कौशल ‘जहांआरा’ यांची भूमिका साकारणार आहे.
-
‘मोगल बादशाह औरंगजेब’ यांची भूमिका अभिनेते यतीन कार्येकर साकारणार आहेत.
-
अभिनेता हरीश दुधाडे ‘रामसिंग’ यांची भूमिका साकारणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवप्रताप गरूडझेप / इन्स्टाग्राम)
आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना