-
२०१६ साली प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटातील गाणीही हिट झाली होती.
-
याच चित्रपटातून अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरूने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.
-
‘सैराट’मुळे रिंकू प्रसिद्धीझोतात आली होती. या चित्रपटामुळे तिने यशाचं शिखर गाठलं होतं.
-
त्यानंतर रिंकूने मागे वळून पाहिलं नाही. ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून तिने अभिनयाद्वारे प्रेक्षकांवर छाप पाडली.
-
‘हण्ड्रेड’ या वेब सीरिजमधून तिने ओटीटवर पदार्पण केलं. या सीरिजमध्ये तिने बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्तासह स्क्रीन शेअर केली होती.
-
रिंकूचा चाहता वर्ग किती मोठा आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. ‘सैराट’मधील परश्याचा आर्चीने अनेकांच्या हृद्याचा ठोका चुकवला आहे.
-
रिंकू सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती तिचे फोटो शेअर करत असते.
-
‘सैराट’ फेम आर्चीला सगळे रिंकू नावाने ओळखत असले, तरी तिचं खरं नाव वेगळं आहे.
-
नुकतंच रिंकूने झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमातील सगळ्याच प्रश्नांना तिने मजेशीर पद्धतीने उत्तर दिली.
-
रिंकूने कार्यक्रमात तिच्या खऱ्या नावाबद्दलही उलगडा केला. रिंकू हे तिचं खरं नाव नसून तिचे आई-बाबा लाडाने तिला ‘रिंकू’ म्हणतात.
-
तिचं खरं नाव ‘प्रेरणा’ असं आहे. प्रेरणा महादेव राजगुरू असं तिचं पूर्ण नाव आहे.
-
रिंकूच्या दहावी आणि बारावीच्या मार्कशीटवरही हेच नाव आहे.
-
परंतु, ती सोशल मीडियावर रिंकू राजगुरू असं नाव लिहिते आणि त्याच नावाने ओळखलीही जाते.
-
(सर्व फोटो : रिंकू राजगुरू/ इन्स्टाग्राम)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य