-
अभिनेता चंकी पांडे सोमवारी २६ सप्टेंबर रोजी ६० वर्षांचा होणार आहे. त्याने वाढदिवसाआधी जवळच्या मित्रांसाठी प्री-बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते.
-
या पार्टीमध्ये त्याची लाडकी लेक अनन्या तिच्या मित्रमैत्रिणींसह हजर होती.
-
सलमान खानने चंकी पांडेच्या बर्थडे पार्टीमध्ये ग्रॅंड एन्ट्री घेतली.
-
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील पार्टीमध्ये उपस्ठित होता.
-
जॅकी श्रॉफ चंकी पांडेच्या प्री-बर्थ डे पार्टीमध्ये पोहोचले.
-
करन जोहर स्टायलिश कपड्यांमध्ये चंकी पांडेच्या प्री-बर्थ डे मध्ये उपस्थित होता.
-
नेहा धुपियाने पती अंगद बेदीसह कॅमेरासमोर पोझ दिली.
-
‘फॅब्यूलस लाईफ ऑफ बॉलीवूड वाईफ्स’ फेम महीप कपूर पती संजय कपूरसह पोझ देताना दिसली.
-
चंकी पांडेची लेक अनन्या पांडे पार्टीला पोहोचली.
-
झायेद खान आणि त्याची पत्नी मलाईका देखील या पार्टीमध्ये उपस्थित होते.
-
आयुष शर्मा स्वत: गाडी चालवत चंकी पांडेच्या प्री-बर्थ डे पार्टीमध्ये एन्ट्री घेताना.
-
‘फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलीवूड वाईफ्स २’ च्या काही भागांमध्ये चंकी पांडे दिसला होता. या शोमध्ये त्याची पत्नी भावना पांडे प्रमुख भूमिकेत आहे. सर्व फोटो – वरिंद्र चावला/ Varinder Chawla