-
‘पुष्पा’ चित्रपटामुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री रश्मिका मंदना आपल्या लूकमुळे कायमच चर्चेत असते.
-
‘पुष्पा: द राइज’ चित्रपट तुफान गाजला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे या भागातदेखील अल्लू बरोबर रश्मिका दिसणार आहे.
-
रश्मिका ही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अगदी कमी वेळात १०० कोटी क्लबमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री ठरली.
-
नुकताच तिचा डेनिम लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
तिच्या या बोल्ड डेनिम लूकने तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
-
रश्मिकाचा जन्म ५ एप्रिल १९९६ रोजी कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यात झाला.
-
अभ्यासाच्या बरोबरीने तिने मॉडेलिंगलाही सुरुवात केली आणि काही जाहिरातींमध्ये ती दिसली.
-
रश्मिकाने रमया कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केले.
-
२०१८ मध्ये रश्मिकाने तेलुगू चित्रपट ‘चालो’ द्वारे तेलुगु चित्रपटाच्या दुनियेत पदार्पण केले.
-
रश्मिकाने त्याच वर्षी तेलुगु चित्रपट ‘गीता गोविंदम’ मध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली.
-
रश्मिका मंदान्ना प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसली आहे.
-
ती आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे, गुडबाय नावाच्या चित्रपटात ती काम करत आहे, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल