-
नॅशनल क्रश आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे.
-
साऊथमध्ये तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
-
ती अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्याबरोबर गूडबाय चित्रपटातून डेब्यू करणार आहे.
-
आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या रश्मिकाच्या हातावर टॅटू आहे.
-
तिच्या उजव्या हाताच्या मनगटावर एक टॅटू आहे.
-
तिने हा टॅटू २०१८ साली बनवून घेतला होता.
-
रश्मिकाने तिच्या हातावर “Irreplaceable” असं लिहून घेतलंय.
-
तिने प्रेमप्रकरणातून हा टॅटू बनवून घेतल्याचं म्हटलं जात होतं. पण तसं नाहीये. हा टॅटू काढून घेण्यामागचं कारणं खुद्द रश्मिकानेच सांगितलं.
-
Irreplaceableचा अर्थ स्थिर किंवा जे बदलता येत नाही, असा होतो.
-
“मी Irreplaceable आहे, तुम्ही पण Irreplaceableआहात. या टॅटूचं महत्त्व असं आहे की आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या जागी अद्वितीय आहे आणि तुमच्या आयुष्यात कोणीही दुसरी व्यक्ती तुमची जागा घेऊ शकत नाही,” असं रश्मिका या टॅटूबद्दल बोलताना म्हणाली होती.
-
रश्मिकाने हा टॅटू फार विचारपूर्वक बनवल्याचं म्हटलं जातं.
-
रश्मिका अनेक वेळा फोटोशूटमध्ये तिचा हा टॅटू फ्लॉँट करत असते.
-
तिचा टॅटू ती कधीच लपवत नाही.
-
(सर्व फोटो रश्मिका मंदानाच्या इन्स्टाग्रामवरून साभार)
-

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा