-
अभिनेत्री उर्वशी रौतेला ही तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते.
-
उर्वशी रौतेला रुपेरी पडद्यावर कमी दिसली असली तरी ती नव्या पिढीतील मुलींची नवीन फॅशन आयकॉन बनली आहे.
-
गायक हनी सिंगच्या ‘लव्ह डोस’ या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केल्यानंतर उर्वशी लोकप्रिय झाली.
-
-
तिच्या फॅशन्स सेन्सने सर्वांना भुरळ घालत असते. आता पुन्हा एकदा तिच्या ड्रेसची आणि खास करून त्याच्या किंमतीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
-
अलीकडेच, बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला एका पार्टीत सहभागी झाली होती. तिथे तिने घातलेल्या ड्रेसने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले.
-
विदेशी ब्रँड ‘एटेलियर जुहरा’चा लाल रंगाचा ड्रेस तिने परिधान केला होता. या लाल रंगाच्या ड्रेसने तिच्या सौंदर्यात भर घातली होती.
-
यावेळी तिने ब्रेसलेटसह हिऱ्याचे कानातले घातले होते तर केसांचा स्लीक पोनीटेल बांधला होता.
-
या पार्टीत तिने घातलेल्या ड्रेसची किंमत ६० लाख रुपये होती.
-
या ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर उर्वशीने घातलेल्या ड्रेसची किंमत दिसत आहे.
-
उर्वशीच्या ड्रेसची किंमत ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
-
आता या तिच्या ड्रेसच्या किंमतीने पुन्हा एकदा तिचे नाव सर्वांच्या संभाषणात येत आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”