-
बिग बॉस या शोची सर्वत्र चर्चा आहे. १ ऑक्टोबरपासून बिग बॉसचा नवा सीझन सुरु होणार आहे.
-
सलमान खानने बिग बॉसच्या बऱ्याच सीझनमध्ये सूत्रसंचालन केले आहे. पण यावेळी तो अन्य स्पर्धकांसह खेळामध्ये सहभागी होणार आहे.
-
१. टीना दत्ता – ‘उतरन’ या मालिकेमुळे टीना दत्ताला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमध्ये तिने ‘इच्छा’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. ‘खतरो के खिलाडी’च्या सातव्या सीझनमध्येही ती दिसली होती.
-
२. शालीन भनोट – शालीन भनोटने ‘नागिन’, ‘दो हंसो का जोडा’, ‘दिल मिल गए’, ‘सूर्यपूत्र कर्ण’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तो ‘नच बलिए’ या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वाचा विजेता आहे.
-
३. गौतम विग – गौतम विग हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे. तो ‘साथ निभाना साथिया २’, ‘पिंजरा खूबसूरती का’, ‘तंत्र’, ‘नामकरण’, ‘इश्क सुभान अल्लाह’ या मालिकांमध्ये झळकला आहे.
-
४. सुंबुल तौकीर खान – ‘इमली’ या मालिकेमध्ये सुंबुल तौकीरने प्रमुख पात्र साकारले होते. या मालिकेमधली तिची आणि अभिनेता फहमन खानची केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडली होती.
-
५. शिव ठाकरे – ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सीझनचा विजेता शिव ठाकरे देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहे. त्याने एम टिव्हीच्या ‘रोडीज’ या कार्यक्रमामध्येही भाग घेतला होता.
-
६. शिविन नारंग – ‘बेहद २’ या मालिकेमधले शिविन नारंग याने साकारलेल्या रुद्रा रॉय या पात्राला खूप लोकप्रियता मिळाली. शिविनने ‘इंटरनेटवाला लव्ह’, ‘सुवरीन गुग्गल’, ‘एक वीर की अरदास वीरा’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
-
७. मान्या सिंग – फेमिना मिस इंडिया २०२० उपविजेती मान्या सिंगदेखील बिग बॉसच्या घरामध्ये दिसणार आहे. (सर्व फोटो संबंधित कलाकारांच्या इन्स्टाग्रामवरुन सभार)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल