-
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. आपला दिनक्रम, चित्रपट, कुटुंबाबाबत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते.
-
चाहत्यांशी संवाद साधण्याचा हा तिचा अनोखा फंडा आहे.
-
प्राजक्ता सुत्रसंचालन करत असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही काळासाठी ब्रेक घेतला होता.
-
आता पुन्हा हा कार्यक्रम नव्या जोमाने सुरु झाला आहे. सध्या आपण लंडनला असल्याचं प्राजक्ताने फोटो पोस्ट करत सांगितलं होतं.
-
एका नव्या मराठी चित्रपटासाठी प्राजक्ताच्या नावाची वर्णी लागली आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती लंडनला पोहोचली आहे.
-
मध्यंतरी तिने एक पोस्ट शेअर केली होती. यावेळी लंडनमध्ये चित्रीकरण करत असल्याचा आनंद तिने व्यक्त केला.
-
प्राजक्ता वैभव तत्त्ववादी, संकर्षण कऱ्हाडे या कलाकारांबरोबर आगामी मराठी चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे.
-
पण चित्रीकरणाबरोबरच ती मिळालेल्या वेळेमध्ये लंडनमध्ये फिरत आहे.
-
यादरम्यानचे तिने काही फोटोदेखील इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
काही फोटोंमध्ये अनवाणी पायाने ती लंडनच्या रस्त्यांवर चालत असल्याचं दिसत आहेत.
-
तिच्या हातात बुट आहेत. याचवरून नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. आमच्या मते बुट पायामध्ये घालतात, तु बुट हातात घेऊन का फिरत आहेस? अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”